- Details
- Category: करिअर
बलराम कुमावत यांचे म.न.प. आयुक्तांकडून कौतुक
सन्मान सोहळा…
उल्हासनगर : डॉक्टर बलराम कुमावत हे नेहमी आपल्या सामाजिक कार्यात कार्य करताना आपल्याला दिसतात त्यांनी उल्हासनगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र सुरू केलआहे. या ठिकाणी गरीब व गरजू नागरिकांसाठी त्यांच्याकडून योग्य व कमी दरात उपचार केले जातात. यासोबतच त्यांनी उल्हासनगर महापालिकेतील शिक्षण मंडळ विभागातील निवडून आल्यावर त्या ठिकाणी उत्तम कामगिरी केल्याने त्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे बोर्डात शिफारस केल्यानंतर डॉक्टर बळीराम कुमावत हे Z.R.U.C.C मेंबर म्हणून निवडून आले . यावेळी महाराष्ट्रातील व त्यांच्या झोनमध्ये येणाऱ्या परिसरात जाऊन रेल्वे स्टेशनची पाहणी करणे नागरिकांन सोबत चर्चा करून त्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणे असे अनेक महत्त्वपूर्ण कामे डॉक्टर बलराम कुमावत यांनी रेल्वे बोर्डात केले आहे डॉक्टर बळीराम कुमावत यांनी सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याने त्यांचा सत्कार सन्मान सोहळा उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अजित शेख यांनी केला आहे