- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
तरुण उद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत एकेरी मध्ये उपविजेतेपद व डबल्स मध्ये विजेतेपद पटकावले.
भारतीय कुमावत क्षत्रिय महासभेचे उपाध्यक्ष व कुमावत बेलदार न्युज पोर्टलचे मुख्यसंपादक इंजी.मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत साहेब यांचे चिरंजीव तरुण उद्योजक श्री.श्रीकांत प्रफुल्लचंद्र कुमावत.यांनी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत (35 वर्षांवरील गटात) एकेरी मध्ये उपविजेतेपद व डबल्स मध्ये विजेतेपद पटकावले.
त्याबद्दल त्यांचे भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा., कुमावत समाज विकास सेवा संस्था व कुमावत बेलदार न्युज पोर्टल यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्हा सर्वांच्या शुभ आशीर्वादाने त्यांचा भारतीय संघामध्ये समावेश होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना !🙏🙏🙏
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
IAS कु. पल्लवी वर्मा कुमावत या पहिल्या पोस्टिंगवर तामिळनाडू राज्यात जिल्हाधिकारी पदी रुजू
अखिल भारतीय क्षत्रिय कुमावत समाजाच्या कन्या पल्लवी वर्मा कुमावत यांनी आयएएस (IAS) उत्तीर्ण होऊन, दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तामिळनाडू राज्यातील आयएएस जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
IAS कु. पल्लवी वर्मा कुमावत या पहिल्या पोस्टिंगवर रुजू झाल्या आहेत.
भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा, कुमावत समाज विकास सेवा संस्था आणि कुमावत बेलदार न्यूज पोर्टल यांच्या वतीने IAS कु. पल्लवी वर्मा कुमावत यांचे हार्दिक अभिनंदन!.
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
अभ्यासक्रम तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १४ समिती सदस्यांमध्ये श्रीमती गीतांजली प्रमोद परदेशी, लाडणे हिची निवड करण्यात आली.
ITI च्या अभ्यासक्रमात महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्या पुस्तकाचा उद्घाटन सोहळा दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नागपूर येथे संपन्न झाला.
अभ्यासक्रम तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १४ समिती सदस्यांमध्ये श्रीमती गीतांजली प्रमोद परदेशी, लाडणे हिची निवड करण्यात आली होती.
तरी तिचा सत्कार दरबार हॉल, राजभवन, नागपूर येथे *माननीय मुख्यमंत्र्यी मा.श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार, मंत्री मा.श्री.मंगलप्रभात लोढा यांचे उपस्थितीत व राज्यपाल मा.श्री.रमेशजी बेस यांचे शुभहस्ते पार पडला. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे......
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
आंतरराष्ट्रिय लॉन टेनिस स्पर्धेत श्री.श्रीकांत कुमावत यांनी विजेतेपद मिळविले , भारतीय स्तरावर दुसरे रँकिंग प्राप्त केले
मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रिय लॉन टेनिस स्पर्धेत (३५ वर्षी वरील)स्पर्धेत आमचे मित्र प्रफुल्लचद्र कुमावत(ऊपाध्यक्ष कुमावत क्षत्रिय महासभेचे ऊपाध्यक्ष) यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री.श्रीकांत कुमावत यांनी विजेतेपद मिळविले , व भारतीय स्तरावर दुसरे रँकिंग प्राप्त केले त्याबद्दल कुमावत बेलदार समाज सेवा संघ,कुमावत समाज विकास सेवा संस्था,नाशिक जिल्हा कुमावत समाज ऊन्नती मंडळ तर्फे मनपूर्वक अभिनंदन!.
कुमावत बेलदार न्युज पोर्टल टिमतर्फेही अभिनंदन!..
प्रिय श्रीकांत,तुझा समाजाला अभिमान वाटतो. 🎉🎉🎉👍👍🙏🙏🙏
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
श्रीमती सरुबाई कुमावत- चाळीसगांव तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडुन आल्या.
- Details
- Category: हार्दिक अभिनंदन
पोलीस आयुक्त श्री.वसंतराव परदेशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कुमालदार