- Details
- Category: शैक्षणिक
एम जे एस स्कूल, देहू येथे वसंतराव परदेशी यांचे इ.१० वी च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन
वसंतराव परदेशी (अतिरिक्त पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड) यांनी एम जे एस स्कूल, देहू येथे इ.१० वी च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देहू - सर, आपण आपला किंमती वेळ दिला, दहावीच्या या मुलांना, कसे असावे , काय करावे पुढील करियर निवडताना पाऊल त्यांचे चुकीचे पडणार नाही, पुढील भरारी घेताना एकचित्तही पालक आपले निशब्द झाले. तुमचे मुलामुलींसाठी मूल्यवान मार्गदर्शन ऐकताना शिक्षकगणही भारावून गेला.
तुमचे गुरुपेक्षाही छान मुलांना समजावून सांगताना⭐जर घ्यायची असेल सारी दुनिया कवेत तर दूर राहावे सोशल मिडियापासून आणि सावधान रहावे नेटवर्किंग करताना⭐फसलात या सोशल मीडियाच्या जाळ्यात तर बघाल स्वतःचे करियर बरबाद होताना🌟पूर्ण करावे स्वप्न आपले पण स्मरण ठेवा आई-वडिलांना. त्यांच्यासारखे दैवत नाही आठवण ठेवा हे जग आजमावताना💫सर आपला वेळही कमी पडला आमच्या मते तुमच्याकडील चौफेरचे ज्ञान घेताना⭐असे वाटले आम्हाला तुम्हीच असता सर्वांचे गुरु तर भरकटली नसती आत्ताची पिढी⭐तुमच्यामुळे योग्य दिशा मिळाली असती चढताना ज्ञानाची शिडी⭐ थोड्याच वेळात योग्य आणी पुरक ज्ञान दिले आपण सर्वांना,प्रश्न पडला कसे मानावे आभार आपले या मॉ जगदंबेच्या लेकरांना🌹🙏शतशः धन्यवाद🙏कोटी कोटी नमन ! आम्ही आपल्या आई वडीलांना ज्यांनी घडविले आपणाला अन् अर्जित केलेल्याआपल्या ज्ञानाला👏 वंदन.
- Details
- Category: शैक्षणिक
सकल बेलदार समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सोबत १९६१ ची जाचक अट रद्द बाबत
- Details
- Category: शैक्षणिक
वै. निवृत्तीनाथ महाराज वाचनालयाचे उद्घाटन बेलदारवाडी ता.चाळीसगांव येथे संपन्न
बेलदारवाडी येथे 💐विजयादशमी💐
निमित्त दि २४ /१०/२०२३ मंगळवार रोजी 🌹वै निवृत्तीनाथ महाराज वाचनालय🌹
चे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते . या वाचनालया साठी अनेक दात्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादासो .इं.श्री प्रफुल्लचंद्र कुमावत (ऊपाध्यक्ष : भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा) नासिक हे होते . त्यांनी वाचनालया करीता दोन गोदरेजचे कपाट दिले . तसेच साहेबराव बापु कुमावत अध्यक्ष कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र हे उपस्थित होते त्यांनी उद्घाटन प्रसंगी ११ पुस्तके दिली तसेच
श्री किशोर भाऊ माळवाळ कुपखेडा यांनी एमपीएससी साठी लागणारे जनरल नॉलेजचे पुस्तके दिले .
अॅड. श्री राजेंद्र बघडाणे साहेब (सरकारी वकील ) नासिक यांनी ११ पुस्तके
श्री देविदासजी परदेशी (प्रदेश सचिव ) नासिक यांनी ११ पुस्तके
नंदु बबन कुमावत ११ पुस्तके
दिपक प्रभाकर कुमावत १० पुस्तके
नंदु भिमराव कुमावत १० पुस्तके
जितेंद्र भास्करराव कुमावत १० पुस्तके
अरुण नथ्थु कुमावत १० पुस्तके,
अंबु बुधा पाटील कोदगाव ५ पुस्तके
दिपक नामदेव कुमावत ५ पुस्तके
शिवाजी तुकाराम कुमावत चाळीसगाव १००० रु . व १० पुस्तके दिले . तसेच डॉ . श्री प्रमोद कुमावत (अधिव्याख्याता ) यांनी १० पुस्तके,
रविंद्रजी बैताडे (पुणे ) व उपाध्यक्ष यांनी १० पुस्तके
ज्ञानेश्वर श्रावण कुमावत (मुख्याध्यापक )जळगाव यांनी १० पुस्तके दिलेली आहे . या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन श्री भावलाल कुमावत सर यांनी केले .
अशा प्रकारे वाचनालयास मदत मिळाली आहे .
वाचनालया मुळे गावातील होतकरू मुले -मुली यांना वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा द्वारे आपले ध्येय साध्य करता येईल तसेच वाचनालया द्वारे सि ए टी/ नीट / एमपीएससी / युपीएससी इ . परिक्षेचे मार्ग दर्शन मिळणार आहे .
वाचनालयास अनेक बांधवांनी शुभेच्छा पाठवल्या . यावेळी उपस्थित रविंद्र बेलदार सर मारवाड तसेच बापुसाहेब छल्लारे व मधुकर धनगर सर यांनी मनोगत व्यक्त केले .त्या बद्दल उपस्थित सर्व प्रमुख अतिथी व ग्रामस्थ नागरीक या सर्वांचे आभार .
आपले विनित .
समस्त ग्रामस्थ व निवृत्तीनाथ महाराज तरुणमंडळ
जय बजरंग मित्रमंडळ
बेलदारवाडी .🌹🙏
- Details
- Category: शैक्षणिक
प्रणाली नाईक, गणेश दत्तात्रय नाईक आणि निर्मला गणेश नाईक (देवतवाल) पुणे यांच्या कन्या. आर्किटेक्ट, मल्टीडिसिप्लिनरी डिझायनर, बीआयएम मॅनेजर, फ्रीलान्स आर्टिस्ट आणि उद्योजक.
प्रणाली नाईक, गणेश दत्तात्रय नाईक आणि निर्मला गणेश नाईक (देवतवाल) पुणे यांच्या कन्या.
आर्किटेक्ट, मल्टीडिसिप्लिनरी डिझायनर, बीआयएम मॅनेजर, फ्रीलान्स आर्टिस्ट आणि उद्योजक.
प्रणाली आणि आर्किटेक्ट
प्रणालीचीही कलेकडे कटाक्षाने नजर आहे. ती स्वत: भिंत कलाकार आहे आणि तिने कॅनव्हास पेंटिंगपासून आतापर्यंत 50+ कला प्रकल्प पूर्ण केले आहेत वॉल आर्ट प्रकल्पांसाठी. प्रणाली ही एक असाधारण व्यक्ती आहे जी आर्किटेक्चर, डिझाईन आणि बांधकाम क्षेत्रात सर्जनशीलता आणि व्यावसायिकतेच्या सीमा पुन्हा परिभाषित करत आहे. वॉल आर्ट प्रकल्पांसाठी. प्रणाली ही एक असाधारण व्यक्ती आहे जी आर्किटेक्चर, डिझाईन आणि बांधकाम क्षेत्रात सर्जनशीलता आणि व्यावसायिकतेच्या सीमा पुन्हा परिभाषित करत आहे.

- Details
- Category: शैक्षणिक
कुमावत समाजाची शिक्षणासाठी पहिली महिला पदेशात....कु. आसावरी अतुलराव कुमावत,हिचे मास्टर्स डिग्री ( फिजीओथेरेपी स्पोर्टस् मेडिसीन) मिळवण्यासाठी. यु. के. ( लंडन येथे शेफिल्ड युनिर्व्हसिटी ) परदेशी प्रस्थान
डॉ.कु. आसावरी अतुलराव कुमावत,हिचे मास्टर्स डिग्री ( फिजीओथेरेपी स्पोर्टस् मेडिसीन) मिळवण्यासाठी.
यु. के. ( लंडन येथे शेफिल्ड युनिर्व्हसिटी ) परदेशी प्रस्थान. माझ्या मते वैदयकिय उच्च शिक्षण मिळवण्यासाठी
लंडनला जाणारी कुमावत,बेलदार समाजातील पहिली मुलगी असावी. श्री आर. आर. चव्हाण सर (नासिक) यांची
कु. आसावरी नात असुन श्री अतुलराव चव्हाण दहीमिवाल यांची कन्या आहे. आणि सेवा संघाचे मुंबई झोन अध्यक्ष प्रवीण कुमावत- चव्हाण पुतणीआहे.
दोन वर्षाच्या या उच्च अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
कुमावत बेलदार समाजाच्या शुभेच्छा आणि थोरा मोठ्यांचे आशिर्वाद तिच्या पाठीशी आहेत.
कु. आसावरी हीस उच्च शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा.....आसावरीस कुमावत बेलदार न्युज पोर्टल च्या हार्दिक शुभेच्छा
कु.आसावरी हिचे आज सकाळीच लंडन येथे प्रस्थान झाले असून आम्हास आपला अभिमान वाटतो.
दि. १०.०९.२०२३
- Details
- Category: शैक्षणिक
PSI Exam Syllabus in Marathi PSI हे महाराष्ट्रातील पोलीस विभागांमधील महत्त्वाचे पद आहे
महत्वाचे मुद्दे
PSI Exam Syllabus in Marathi
PSI हे महाराष्ट्रातील पोलीस विभागांमधील महत्त्वाचे पद आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते.
संयुक्त पूर्व परीक्षा PSI (Police Sub Inspector),STI (State Tax Inspector),ASO (Assistant Section Officer) या पदांसाठी असते.
यातील PSI (पोलीस उपनिरीक्षक)पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PSI हे पद महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणारे पद आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत
घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षेचा अभ्यासक्रम (psi exam syllabus) पुढील प्रमाणे –
परीक्षेचे टप्पे १) संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण
२) मुख्य परीक्षा ४०० गुण (पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र)
संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण
विषय व संकेतांक प्रश्न संख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी १०० १०० पदवी मराठी आणि इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
संयुक्त पूर्व परीक्षा
PSI अभ्यासक्रम, psi exam syllabus
१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),
३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,
पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
५) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, '
मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण.
६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र.
७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
PSI होण्यासाठी मुख्य परीक्षा पुढीलप्रमाणे घेतली जाते.
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन
एकूण गुण – ४००
पेपर १ (संयुक्त पेपर) – २०० गुण
पेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण
पे. क्र. विषय गुण प्रश्र्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी
१ मराठी १०० ५० मराठी – बारावी मराठी एक तास
इंग्रजी ६० ३० इंग्रजी – पदवी इंग्रजी
सामान्य ज्ञान ४० २० पदवी
२ सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान २०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास
PSI मुख्य परीक्षा य़ोजना
PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम/ psi exam syllabus – Mains
(संयुक्त पेपर) पेपर १ – २०० गुण
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
इंग्रजी – Common vocabulary, sentence structure, grammar
सामान्य ज्ञान
१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२) माहिती अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
३) संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर,
डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा
निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा,
शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.
पेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण
१) बुद्धिमत्ता चाचणी
२) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान,
पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक
भूगोल – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
३) महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील
सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.
४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची
कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे,
शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
५) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदी,
भारतातील मानवी हक्क व जवाबदार्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून
वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी,(हिंसाचार, भ्रष्टाचार,
दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगार, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा
आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३,
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम १९८९,
हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
६) महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ (Maharashtra Police Act)
७) भारतीय दंड संहिता, १८६० (Indian penal code)
PSI मुलाखत
मुख्य परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत घेतले जाते. या मुलाखतीमध्ये शारीरिक चाचणी अंतर्भूत असते.
निवडीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखत यातील मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.
पी.एस.आय. पदासाठी मुलाखत 40 गुणांची असते. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार
कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो व त्याची मुलाखत घेतली जाते.
PSI शारीरिक चाचणी – एकूण गुण १००
पुरुषांसाठी
१) गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० केल्यास १५ गुण
२) पुल अप्स (८ पुल अप्स प्रत्येकी २.५ गुण एकूण २० गुण
३) लांब उडी ४.५० मी. एकूण गुण १५ गुण
४) धावणे ८०० मी. वेळ २ मिनिटे ३० सेकंद ५० गुण
एकूण १०० गुण
महिलांसाठी
१) गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. २० गुण
२) धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद ४० गुण
३) चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे ४० गुण
एकूण १०० गुण
मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे ४०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत एकूण ५४० गुणांपैकी पीएसआय
पदासाठी निवड केली जाते.
सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ मार्च २०२० रोजी सुधारित केला आहे.