वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पत्नीची सुद्धा देहदान करावयाची इच्छा होती. कै.सौ .विमल दत्तात्रेय नाईक ( बारवाळ ) वय वर्ष 75, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना देहदान करता आले नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार अण्णांनी त्यांच्या पत्नीचे नेत्रदान केले होते अण्णा हे नेहमी त्यांच्या सुनेला व त्यांची डॉक्टर नात व डॉक्टर नात जावई यांना सांगत असे " मी जेव्हा कधी जाईल तर माझे कसलेही अंत्यसंस्कार न करता माझ्या शरीराचे देहदान करावे " असे ते नेहमी म्हणत असत अण्णांचे चे दुःख निधन झाल्यावर त्यांची सून श्रीमती मेघा प्रमोद नाईक (बारवाळ) व त्यांची नात डॉक्टर शितल नाईक(उदीवाळ) तसेच नातं जावई डॉक्टर ऋषिकेश नाईक (उदीवाळ) यांनी त्यांचे सर्व सोपस्कार पार पाडून त्यांची अंतिम इच्छा पूर्ण केली." माझी नात डॉक्टर झाली नात जावई डॉक्टर झाले त्यांनी सुद्धा कुणाच्यातरी देहाचा अभ्यास करूनच शिक्षण घेतले मी गेल्यावर माझा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करून त्यातून उद्याच्या पिढीला शिकायला मिळेल आपल्या अवयवाप्रमाणे कोणाला तरी नवे आयुष्य मिळेल आणि नव्या पिढीच्या डॉक्टरांनाही शिकायला किमान या देहाचा उपयोग होईल अशी उदात्त भावना त्यांची होती देहदान करून त्यांची इच्छा पूर्ण झाली "
कै. श्री. दत्तात्रेय (अण्णा )गोविंदराव नाईक (बारवाळ) यांना
श्री.कुमावत क्षत्रिय न्याती मंडळ (नाईक समाज) पुणे . यांच्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली.कुमावतबेलदारnews पोर्टल च्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रध्दांजली