- Details
- Category: समाजा विषयी
शिवपुराण कथा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला
शिवपुराण कथा 🌹🌹 ग.भा. सरुबाई काशिनाथ कुमावत सरपंच तांबोळे बु// ता. चाळीसगाव जि. जळगाव
यांच्या कडे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते एक समाज प्रबोधनाचे उत्तम काम या परीवाराने केले तसेच त्यांचे पती अपघाती निधन झाले होते म्हणुन त्यांनी पतीच्या रुणातुन मुक्त होण्यासाठी या कथेचे आयोजन केले होते त्यांचे तीन मुल श्री बाळु काशिनाथ कुमावत श्री दिपक काशिनाथ कुमावत श्री ज्ञानेश्वर काशिनाथ कुमावत तसेच त्यांच्या मुली सौ,ज्योती प्रकाश बागोरे सौ. आनिता कुमावत सौ. भारती ज्ञानेश्वर कुमावत सौ त्रिवेणी राहुल कुमावत व सुना नातवंड यांच्या सहकार्याने तसेच संपुर्ण गावकरी व टाळकरी तसेच कथाकार ह भ प संजय महाराज कुमावत माळ पिंपरी तालुका जामनेर यांचे सुंदर असे शिवपुराण आयोजित केले होते कार्यक्रम अनमोल सहकार्यातुन पार पाडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री साहेबराव बापु कुमावत अखिल महाराष्ट् अध्यक्ष हे उपस्थीत होते तसेच बापु छल्लारे चाळीसगाव कोर्टातील विधीसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थीत. होते त्या प्रसंगी समांतर विधीसाहायक जळगाव च्या सौ.भारतीताई कुमावत यांनी लोक अदालत या विषयावर लोकांना सविस्तर माहीती दिली तसेच अध्यात्माला विज्ञानाची जोड का गरजेची आहे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता केली व महाप्रसादाचा अस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला