- Details
- Category: समाजा विषयी
बेलदार समाजाला १९६१च्या रानटी काळ्या कायद्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात सकल बेलदार समितीला यश आले
फटाके फोडून स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष
१९६१च्या रानटी काळ्या कायद्याचा विद्रोहाचे घासलेट टाकून अंत्यसंस्कार केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाने फटाके फोडून आज खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष साजरा केला.
याचे विशेष असे की बेलदार समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे ते मुंबई पायी मोर्चाचे आयोजन केले होते.यासाठी बेलदार समाजाचे नेते मा.रविंद्रभाऊ चव्हाण,मा.राजाराम मामा मोहिते,मा.मारूती दादा पवार, साहेबराव बापु कुमावत, रोहिदास चव्हाण, विजय चव्हाण,संतोष साळुंखे, एकनाथ भाऊ मोहिते, विशाल साळुंखे, माऊली पवार, गुलाबराव पवार, रवी जाधव,दिनकर मोहिते,शालिग्राम पवार,बबन चव्हाण, नंदकिशोर चव्हाण,रमेश जाधव, संदिप मोहिते, अनिल चव्हाण, इत्यादींच्या अथक प्रयत्नातून पुणे ते मुंबई मोर्चाचा दि.९डिसेंबर २०२३हा दिवस उजाडला.सकाळी ठीक ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा पुणे शहराच्या चौका चौकातून भाषणे करत, घोषणा देत मुंबईकडे आगेकुच करत असतांनाच पोलिस प्रशासनाने दिघी येथे मोर्चा अडवून दि.११ डिसेंबर पर्यंत मोर्चा स्थगित करायला सांगितले.त्यांच्या सूचनांचे निश्चित पालन करण्यात आले.परंतु मा.रविंद्रभाऊ चव्हाण यांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता तात्काळ आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.आन भोसरी येथील कानुसती माता मंदिराच्या आवारातच उपोषण सुरू केले.अनेक संघटनांनी,लेखक,कवी, कलाकार,अधिका-यांनी उपोषण मंडपास भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.पोलिस प्रशासन,जिल्हाधिका-याकडून तीन दिवस उपोषण कर्त्यांची चांगली दखल घेतली गेली.शेवटी दि.१२/१२/२०२३रोज मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिका-याकडून सकल बेलदार समितीला जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले.दोन तास चाललेल्या चर्चे नंतर पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाला १९६१च्या रानटी काळ्या कायद्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात सकल बेलदार समितीला यश आले.हाच निकश आता संपूर्ण महाराष्ट्रातील बेलदार समाजाला लागू राहील असे समजायला काही हरकत नाही.या यशामुळे पुण्यातील संपूर्ण बेलदार समाजाने आज खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा फटाके फोडून जल्लोष केला.या यशासाठी महाराष्ट्रातील तमाम बेलदार समाजाकडून सकल बेलदार समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्वत्र तोंड भरून कौतुक केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष:- साहेबराव बापु कुमावत,रविंद्रजी बैताडे,संजयजी परदेशी सर