स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
15 ऑगस्ट पासून कुमावत बेलदार हे पोर्टलची सुरुवात करीत आहे. नवीन माध्यमातून नवीन शतकाचा विचार करून हे काम सुरू करणार आहे.
आपले आशीर्वाद पाहिजे म्हणजे यश मिळेल.
धन्यवाद
देविदास मुरलीधर परदेशी (पन्हेर)
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.
कुमावत समाजा करिता कुमावत बेलदार वेब पोर्टल मा. प्रफुल्लचंद्र कुमावत साहेबांबरोबर कार्य सुरू करत आहे. या वेब पोर्मटल मध्ये समाज फक्त समोर ठेवून गट-तट वगैरे नाही असे कार्य करायचे आहे आपल्या सर्वांचे सहकार्य पाहिजे.