कुमावत समाजाची पहिली भारतीय युवा तरुणी अनुष्का कुमावत 2.25 कोटीची शिष्यवृत्ती व अमेरिकेत पुढील उच्च शिक्षणासाठी रवाना
- Details
- Category: कुमावत बेलदार
🚩*जय श्रीराम* 🚩
🌹 सुंदर असावे सुंदर दिसावे या पेक्षा चांगले आणि सुंदर अवकाशाचे ज्ञानार्जन करावे अशी स्वप्न उराशी बाळगून अत्यंत कठोर परिश्रम करून ज्ञानार्जनाच्या पंखांना बळ💪 देण्यासाठी आपल्याच कुमावतांची म्हणजे ⭐श्री.शरदराव व सौ.आश्र्विनिताई कुमावत रा.भोसरी⭐⭐ यांची गुणवंत,यशवंत कन्या 💫आज अमेरिकेतील " Ohio Wesleyan University त 🌹 Astrophysics व Artificial Intelligence या शिक्षणासाठी *अमेरिकेत जात आहे.
💫 तिच्या भावी स्वप्नांच्या पंखांना*💫 *आशिर्वादरूपी बळ देऊया.⛳ बेटा अनुष्का⛳तुला खूप खूप शुभेच्छा 💐 तुझी अशीच प्रगती उंच शिखरावर पोहोचो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.👏* जेव्हा परतून येशील तेव्हा नक्कीच तू घेतलेल्या ज्ञानार्जनाचे भांडार💰 सोबत आणशील त्याचा उपयोग तू आपल्या भावी पिढीस देशील जेणेकरून प्रत्येकजण तुझ्यासारखी प्रेरणा घेऊन 🌟ज्ञानार्जनासाठी ✈️अमेरिकेत जाण्यास प्रेरित होतील , 🌟गर्व आहे आम्हा सर्वांना तुझा व तुझ्या आईं बाबांचा 💪ज्यांनी तुला घडविले त्या सर्वांचा. 💪 🌹 Happy journey Dear Anushka
प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत (सरताळे)
- Details
- Category: कुमावत बेलदार
स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
15 ऑगस्ट पासून कुमावत बेलदार हे पोर्टलची सुरुवात करीत आहे. नवीन माध्यमातून नवीन शतकाचा विचार करून हे काम सुरू करणार आहे.
आपले आशीर्वाद पाहिजे म्हणजे यश मिळेल.
धन्यवाद