- Details
- Category: शैक्षणिक
वै. निवृत्तीनाथ महाराज वाचनालयाचे उद्घाटन बेलदारवाडी ता.चाळीसगांव येथे संपन्न



बेलदारवाडी येथे 💐विजयादशमी💐
निमित्त दि २४ /१०/२०२३ मंगळवार रोजी 🌹वै निवृत्तीनाथ महाराज वाचनालय🌹
चे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते . या वाचनालया साठी अनेक दात्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादासो .इं.श्री प्रफुल्लचंद्र कुमावत (ऊपाध्यक्ष : भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा) नासिक हे होते . त्यांनी वाचनालया करीता दोन गोदरेजचे कपाट दिले . तसेच साहेबराव बापु कुमावत अध्यक्ष कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र हे उपस्थित होते त्यांनी उद्घाटन प्रसंगी ११ पुस्तके दिली तसेच
श्री किशोर भाऊ माळवाळ कुपखेडा यांनी एमपीएससी साठी लागणारे जनरल नॉलेजचे पुस्तके दिले .
अॅड. श्री राजेंद्र बघडाणे साहेब (सरकारी वकील ) नासिक यांनी ११ पुस्तके
श्री देविदासजी परदेशी (प्रदेश सचिव ) नासिक यांनी ११ पुस्तके
नंदु बबन कुमावत ११ पुस्तके
दिपक प्रभाकर कुमावत १० पुस्तके
नंदु भिमराव कुमावत १० पुस्तके
जितेंद्र भास्करराव कुमावत १० पुस्तके
अरुण नथ्थु कुमावत १० पुस्तके,
अंबु बुधा पाटील कोदगाव ५ पुस्तके
दिपक नामदेव कुमावत ५ पुस्तके
शिवाजी तुकाराम कुमावत चाळीसगाव १००० रु . व १० पुस्तके दिले . तसेच डॉ . श्री प्रमोद कुमावत (अधिव्याख्याता ) यांनी १० पुस्तके,
रविंद्रजी बैताडे (पुणे ) व उपाध्यक्ष यांनी १० पुस्तके
ज्ञानेश्वर श्रावण कुमावत (मुख्याध्यापक )जळगाव यांनी १० पुस्तके दिलेली आहे . या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन श्री भावलाल कुमावत सर यांनी केले .
अशा प्रकारे वाचनालयास मदत मिळाली आहे .
वाचनालया मुळे गावातील होतकरू मुले -मुली यांना वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा द्वारे आपले ध्येय साध्य करता येईल तसेच वाचनालया द्वारे सि ए टी/ नीट / एमपीएससी / युपीएससी इ . परिक्षेचे मार्ग दर्शन मिळणार आहे .
वाचनालयास अनेक बांधवांनी शुभेच्छा पाठवल्या . यावेळी उपस्थित रविंद्र बेलदार सर मारवाड तसेच बापुसाहेब छल्लारे व मधुकर धनगर सर यांनी मनोगत व्यक्त केले .त्या बद्दल उपस्थित सर्व प्रमुख अतिथी व ग्रामस्थ नागरीक या सर्वांचे आभार .
आपले विनित .
समस्त ग्रामस्थ व निवृत्तीनाथ महाराज तरुणमंडळ
जय बजरंग मित्रमंडळ
बेलदारवाडी .🌹🙏

