- Details
- Category: विचार मंथन
मत प्रतिक्रिया
द्वारा :शिवाजी तुकाराम कुमावत
ता. चाळीसगाव
दिनांक 24 जानेवारी 2024
प्रति
म.संपादक साहेब
कुमावत बेलदार न्यूज पोर्टल ,नाशिक.
आपण कुमावत बेलदार न्यूज पोर्टलची स्थापना केली ही कुमावत बेलदार समाजासाठी भूषणावह आहे तसेच हा उपक्रम अभिनंदनीय व स्तुत्य आहे.
आपण कुमावत बेलदार समाजासाठी महाराष्ट्रभर उपयुक्त माहितीस्तव 2024 चे आदर्श दिनदर्शिका प्रसिद्ध केली ती संपूर्ण बाराही महिन्याची वाचली तर प्रत्येक महिन्यात दुग्धशर्करा योगच वाचावयास मिळत गेला .त्यात अत्यंत कठोर तपश्चर्याने ,परिश्रमाने ,अनुभवाने अशा थोर व्यक्तींचे हितगुजांचे लिखाण केलेले आहे. या थोरांचे मार्गदर्शन समाजास लाभले आहे व लाभेलही! ते रोज प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे व त्यानुरूप रोजची दैनंदिनी आखली पाहिजे म्हणजे निश्चितच जीवनात अमुलाग्र बदल होऊ शकतो असे माझे प्रामाणिक मत आहे .
दिनदर्शिका 2024 मधील श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्यांनी समाजातील अडीअडचणी आम्ही सोडवू ,प्रयत्न करू ,वेळ देऊ असा उदात्त हेतू सुद्धा प्रकट केला आहे
संपादक मंडळांनी आपला बहुमोल वेळ खर्च केला त्यांचा मी ऋणी आहे.
धन्यवाद