• Login
  • Submit News
समाजाची जनगणना Contact Us
 
Kumawat Beldar Kumawat Beldar
  • मुख्यपान
  • शहर
  • क्रीडा
  • राजकारण
  • करिअर
  • आरोग्य
  • विचार मंथन
  • उल्लेखनीय व्यक्ती
Details
Category: विचार मंथन

परिस्थिती गंभीर, बाप खंबीर; लेकीचा सासरी छळ, वडिलांनी वाजतगाजत माहेरी आणलं; वरातीची चर्चा

परिस्थिती गंभीर, बाप खंबीर; लेकीचा सासरी छळ, वडिलांनी वाजतगाजत माहेरी आणलं; वरातीची चर्चा
सासरच्यांकडून लेकीचा छळ होत असल्यानं वडिलांनी तिला वाजतगाजत माहेरी आणलं. लेकीची त्रासातून सुटका झाल्याचा आनंद त्यांनी बँडबाजा वाजवून साजरा केला. या वरातीची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.

Authored By कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Oct 2023, 2:27 pm
Follow
रांची: रांचीमध्ये निघालेल्या एका वरातीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सासरी निघालेल्या लेकीसाठी नव्हे, तर सासरी छळ होत असलेल्या लेकीला माहेरी आणण्यासाठी एका बापानं वरात काढली. सासरच्यांच्या जाचापासून लेकीची सुटका करण्यासाठी बापानं तिला वाजतगाजत घरी आणलं. वरातीमध्ये बँडबाजा होता. आतषबाजी करण्यात आली.
father daughter

१५ ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या वरातीचा व्हिडीओ वडिलांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. 'मोठी स्वप्नं डोळ्यांत घेऊन आपण लेकींची लग्नं लावतो. पण जेव्हा त्यांचा जोडीदार, कुटुंब वाईट निघतात, त्यांना चांगली वागणूक देत नाहीत, तेव्हा आपल्या मुलींचा सन्मान राखण्यासाठी त्यांना पुन्हा घरी आणायला हवं. कारण लेकी अनमोल असतात,' असं प्रेम गुप्ता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ट्रक पेटल्यानं मृत पावलेला माजी नौदल कर्मचारी २० वर्षांनंतर जिवंत; ३ खुनांचं गूढ उकललं
झारखंडच्या रांचीमधील कैलाश नगरमधील कुम्हारटोली परिसरात राहणाऱ्या प्रेम गुप्ता यांनी त्यांची लेक साक्षीचा विवाह वर्षभरापूर्वी धुमधडाक्यात लावून दिला. झारखंड वीज वितरण विभागात सहायक अभियंता असलेल्या सचिन कुमारसोबत २८ एप्रिल २०२२ रोजी साक्षीचं लग्न झालं. सचिन रांचीच्या सर्वेश्वरी परिसरात राहतो. लग्नानंतर काही दिवसांनीच सासरच्यांनी साक्षीला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप प्रेम गुप्ता यांनी केला.
सचिन अनेकदा साक्षीला घराबाहेर काढायचा. सचिनची आधी दोन लग्नं झाली असल्याचं साक्षीला समजलं. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतरही साक्षीनं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शोषण आणि जाचामुळे तिला सासरी राहणं अवघड जाऊ लागलं. त्यामुळे तिनं या नात्यातून बाहेर पडण्याचा, सासर सोडण्याचा निर्णय घेतला.

मजुराच्या खात्यात आले तब्बल २२१ कोटी, ITनं नोटिस पाठवली; मग ४ वर्षांपूर्वीची घटना आठवली
साक्षीच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनादेखील खंबीरपणे साथ दिली. वडील आणि माहेरच्या मंडळींनी वरात काढत तिला वाजतगाजत घरी परत आणलं. लेकीची जाचातून मुक्तता झाली. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी वरात काढल्याचं प्रेम गुप्ता यांनी सांगितलं. साक्षीनं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मुलानं तिला पोटगी देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे लवकरच घटस्फोटावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Previous article: मत प्रतिक्रिया Prev Next article: 2018 मध्ये सादर करण्यात आलेले "वन नेशन, वन रेशन कार्ड" ही भारतातील अंतर्गत स्थलांतरितांसह सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधार-आधारित राष्ट्रीय रेशन कार्ड पोर्टेबिलिटी योजना आहे Next

सामाजिक

  • हार्दिक अभिनंदन
  • शैक्षणिक
  • समाज सुधारक
  • शिष्यवृत्ती
  • उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व
  • समाजा विषयी
  • भावपूर्ण श्रद्धांजली
  • रोजगार

interviewमुलाखत

Screenshot 2023 09 24 13 22 00 91 e55d67e6190e80b161828c9e2aa77e01

इ. प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत (सरताळे)

prafullachandra kस्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत  (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.

15 ऑगस्ट पासून कुमावत बेलदार हे पोर्टलची सुरुवात करीत आहे. नवीन माध्यमातून नवीन शतकाचा विचार करून हे काम सुरू करणार आहे.

आपले आशीर्वाद पाहिजे म्हणजे यश मिळेल.

धन्यवाद

देविदास मुरलीधर परदेशी (पन्हेर)

devidas pरयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त ,  बारा बलुतेदार, बेलदार समाज उप  जातीचे ही सामाजिक कार्य करतो.

कुमावत समाजा करिता कुमावत बेलदार  वेब  पोर्टल मा. प्रफुल्लचंद्र कुमावत  साहेबांबरोबर कार्य सुरू करत आहे.  या वेब पोर्मटल मध्ये समाज फक्त समोर ठेवून गट-तट वगैरे नाही असे कार्य करायचे आहे आपल्या सर्वांचे सहकार्य पाहिजे.

 

Copyright © 2023 www.KumawatBeldar.com. All Rights Reserved.
Website developed by 'The LightHouse IT Solutions'