माहीती,जाहीराती,भावपुर्ण श्रद्धांजली,समाजातील आयएएस,आयपीएस,डीन,आयएएस,आयसीएस,जीइएस,एमपीएसी,युपीएससी टॉपर,वैद्यकिय व क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य असणाऱ्या समाज बांधव यांच्या मुलाखत,मार्गदर्शन विद्यार्थी यांना प्रेरणादायी लेक्चर्स भरपुर काही ऊपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले,प्रोप्रा. प्रफुल्लचंद्रजी कुमावत यांनी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती,गरीब होतकरु मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी मदत,शाळकरी मुलांना शिष्यवृत्ती अशा अनेक प्रकारे मदत करत या वेब पोर्टल व पीपी फाऊंडेशन तर्फे करत राहील असे जाहीररीत्या सांगितले.
मला आवड किंवा इन्कमसोर्स कर करीता न्युज पोर्टल सुरु केले नसुन याचे मार्फत सेवापुर्ती नंतर समाजसेवा करणार असल्याचे सांगितले.अतिरीक्त सरकारी अभियोक्ता यांनी वेब पोर्टलला शुभेच्छा देत आज कशी वेब पोर्टलची गरज व कार्य याबाबत माहीती दिली. जिल्हा ऊपाध्यक्ष अतुलभाऊ चव्हाण यांनी नाशिक जिल्हा कुमावत बेलदार समाजाच्या वतीने शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पदाधिकारी व ऊपस्थीत समाज बांधव यांना वेब पोर्टल लिंक शेअर करुन जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यत माहीती पोहचविण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
ऊपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी जास्तीत जास्त समाज बांधव जोडले गेल्यावर पेज वरील व्हुज वरुन पोर्टलचे रेटींग वाढल्यास त्याने वेबपोर्टलला फायदा असतो.भेट द्या.तसेच जास्तीत जास्त जाहीराती द्या.त्या जाहीरातीच्या व मुलामुलींच्या बायोडाटा प्रसिध्दी च्या पैशांनी अनेक गरजुंना शैक्षणिकतेला मदत होणार असल्याने आपलाही या कार्यात सहभाग होईल.असे सांगितले.वेबपोर्टल आजच्या युगातील मानुस मानसाच्या जवळ असुन जरीही दुर असला तरी या गतीमान जिवनाच्या हालचाली,जनगणणा ज्याने आपली संख्या जाहीर झाली तर सरकार महामंडळ देऊ शकते.बेलदार व ऊपजातींसोबत जनगणणा झाली तरही हरकत नाही.पण आकडेवारी कळाल्यावर समाजाचा फायदाच होईल.तसेच आज ऊदघाटन झाले तर लगेचच कार्य सुरु होत नाही.
अजुन पोर्टल अंडरकंस्ट्रक्शन आहे.संचालकांनी लवकरच जनसेवेत वेब पोर्टल जोमाने सुरु करावे.सर्व समाज बांधव या वेब पोर्टलला भेट देतील.अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या संपर्कातील बांधवांना लिंक शेअर करुन चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.प्रदेश अध्यक्ष साहेबराव बापु यांनी ऊदघाटन बाबत फोनवर माहीती जाणुन घेतली व शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व कुमावत सभेचे ऊपाध्यक्ष बापुसाहेब तुसे कुमावत यांनीही फोनवर माहीती जाणुन घेत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रम प्रसंगी शिवाजीराव कारवाळ,पोपटराव कारवाळ,बापुसाहेब कारवाळ,भगवानराव अनावडे,पंडीतराव कुमावत,कैलासराव माळवाळ,अशोकराव कुमावत सर, दिपक मुंडावरे,कैलास राव कुंडलवाल, साचीनराव परदेशी,अतुलभाऊ चव्हाण,भाऊसाहेब कुमावत,अमोलदादा कुमावत,समीर छापरवाळ,वेब डिझाईनिंग कर्ता नागरे,गजाननजी नारळे,यांचे सह बरेच समाजबांधव ऊपस्थीत होते.मा.जिल्हाध्यक्ष अशोकराव कुमावत यांचे फार्महाऊस येथे सहभोजनाचा आनंद घेतला.