👉 या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीकांत भाऊ परदेशी उपस्थित होते.
👉तसेच मान्यवर ---
मा.श्री.बापूजी कुमावत,प्रदेश उपाध्यक्ष
मा.श्री.भगवानजी कुमावत,प्रदेश सचिव
मा.श्री.विनयजी नाईक,राष्ट्रीय मंत्री भारतीय कुमावत महासभा
मा.श्री.प्रफुलचंद्रजी कुमावत-- ऊपाध्यक्ष:भारतीय कुमावत क्षत्रिय महासभा जयपूर तथा kumawatbeldar.com न्युज पोर्टलचे संचालक,
मा.श्री.शंकरजी कुमावत,खान्देश प्रमुख
मा.श्री. घनशामजी कुदेवाल,वरिष्ठ उपाध्यक्ष
मा.श्री.चंदनजी नाईक,आय टी सेल प्रमुख
मा.सौ.रीनाताई नाईक,महिला सचिव राज्य कार्यकारणी
मा.सौ.लताताई नारोळे,महिला अध्यक्ष मुंबई विभाग
मा.श्री.बलरामजी कुमावत-- राजकीय व सामाजिक पदाधिकारी व रेल्वेचे शासकीय समन्वय अधिकारी,
इत्यादी.....

👉 कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित असलेले सर्व समाज बांधव व भगिनी यांचे कुमावत बेलदार समाज सेवा संघ मुंबई विभाग तर्फे स्वागत करण्यात करण्यात आले.

👉 त्यानंतर प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते आराध्य दैवत प्रभू श्री.रामचंद्रजी यांचे पूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले.

👉त्यानंतर मुंबई विभाग मा.अध्यक्ष श्री.प्रवीणजी कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले. समाज कार्यात जास्तीत जास्त बांधवांनी व भगिनी यांनी सहभाग घेऊन समाज विकास कार्यात मदत करायला पाहिजे असे मत व्यक्त केले.

👉त्यानंतर मुंबई विभाग मा.महिला अध्यक्ष सौ.लताताई नारोळे यांनी मनोगत व्यक्त केले. समाज प्रती असलेला दृष्टीकोन बदलणे ही काळाची गरज आहे,एकत्र येऊन समाजात निर्माण होणाऱ्या अनेक समस्या सोडविल्या पाहिजेत,त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,असे मत व्यक्त केले.

👉त्यानंतर मा.संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीकांत भाऊ परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.समाज माझ्या साठी काय करतो? या पेक्षा मी समाज करिता काय करू शकतो? ही वर प्रत्येकाने विचार केला पाहिजे,आपल्या समाजातील विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले पाहिजे,गरजू समाज बांधवांना आपणच मदत केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मुंबई विभाग मार्फत घेतले जाणारे कार्यक्रमाचे कौतुक त्यांनी केले.

👉 त्यानंतर मा.संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीकांत भाऊ परदेशी यांनी मुंबई विभाग नवीन पदाधिकारी व कार्यकारणी आणि तसेच महिला विभाग पदाधिकारी व कार्यकारणी यांना फुल देऊन पुढील समाज कामकाजाच्या वाटचालीसाठी शुभेच्छ दिल्यात.

👉त्यानंतर मा.संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीकांत भाऊ परदेशी यांच्या हस्ते उपस्थित असलेले जेष्ठ नागरिक (पुरुष व महिला) यांचा शाल,श्रीफळ,फुल देऊन सत्कार करण्यात आला.

👉 त्यानंतर मा.संस्थापक अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या हस्ते उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव गुणवंत शाल,ट्रॉफी,सन्मान पत्रक,फुल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

👉 त्यानंतर मा.संस्थापक अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या हस्ते उपस्थित असलेले विशेष नैपुण्य असलेले गुणवंत व्यक्तीचा व उद्योजक यांचा ट्रॉफी,शाल, श्रीफळ,सन्मान पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.💐💐🙏🙏

👉अश्या पद्धतीने कार्यक्रम अतिशय शिस्त पद्धतीने, नियोजन,उत्तम रित्या संपन्न झाले असे जाहीर करण्यात आले.

👉कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.त्यानंतर नाष्टा,चहा चे वाटप करण्यात आले.

👉 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा.उपाध्यक्ष श्री.कृष्णाजी कुमावत व मा.महिला सचिव श्रीम.दिपाली बागोरे यांनी केले.

👉 मा.मुंबई विभाग अध्यक्ष श्री.प्रवीणजी कुमावत,मा.मुंबई विभाग सचिव श्री.श्रीपादजी नाईक,मा.कार्याध्यक्ष श्री.सुदामजी बेलदार यांनी कार्यक्रमाचे नियोजन,कामकाज उत्तम रित्या पूर्ण करण्यास मेहनत व सहकार्य केले बद्दल मुंबई विभाग पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकारणी यांचे खूप खूप आभार व्यक्त केले.👌🙏

👉कार्यक्रमासाठी जमा असलेली रक्कम आणि खर्च झालेली रक्कम,बिले यांचा संपूर्ण सविस्तरपणे तपशील अथवा हिशेब मा.मुंबई विभाग अध्यक्ष यांनी ठेवलेला आहे,कोणास अधिक माहिती हवी असल्यास मा.मुंबई विभाग यांच्या निवासस्थानी जाऊन संपर्क साधून घेऊ शकता.👌👍🙏

आपला,(बातमी देणार)
श्री.श्रीपाद संदीप नाईक (दैमिवाळ)
मुंबई विभाग सचिव
कुमावत बेलदार समाज सेवा संघ